ताज्या बातम्यामहाराष्ट्र

“योगा” भारतीय संस्कृतीची महान परंपरा : राजे समरजीतसिंह घाटगे ; जयसिंगराव घाटगे हायस्कूलच्या प्रांगणात योग दिन उत्साहात

कागल प्रतिनिधी : विजय मोरबाळे

आध्यात्मिक, मानसिक आणि शारीरिक संतुलन राखण्यासाठी योगा  एक उत्तम मार्ग आहे.आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रयत्नातून नऊ वर्षांपूर्वी साकारलेली ” योगा” ही आपल्या संस्कृतीची महान परंपरा आहे. ती जोपासण्याचे आणि संपूर्ण विश्वामध्ये पोहोचवण्याचे काम त्यांनी केले असल्याचे प्रतिपादन भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजे समरजीतसिंह घाटगे यांनी केले.

   यावेळी श्री.घाटगे म्हणाले भारताची ही महान योगसंस्कृती योगाचे मानवी जीवनातील महत्त्व लक्षात घेऊन जगाच्या कानाकोपऱ्यात आजचा दिवस मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो.मानवी शरीर आणि मन यांच्यामध्ये समन्वय घडवून आणण्याचे महत्त्वपूर्ण काम योगा च्या माध्यमातून होत असल्याचे घाटगे यांनी सांगितले.

 या उपक्रमामध्ये योगशिक्षिका उज्वला डफळे,सुबोधिनी चौगुले यांनी उपस्थित असलेल्या सर्वांनाच योग प्रशिक्षणाचे धडे दिले.यावेळी  परिसरातून आलेल्या अनेक पुरूष, महिलांनी मोठ्या संख्येने या उपक्रमात सहभाग नोंदवला.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks