ताज्या बातम्यामहाराष्ट्र
मोठी बातमी : दहावी-बारावी पुरवणी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर ; ‘या’ तारखेपासून सुरु होणार परीक्षा

बोर्डाने पुरवणी परीक्षेसाठी अर्ज भरून घेतले होते. आता दहावी- बारावी पुरवणी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. यामध्ये लातूर, छत्रपती संभाजीनगर, पुणे, नागपूर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक व कोकण या नऊ विभागीय मंडळाचा समावेश आहे.
उच्च माध्यमिक प्रमाणपत्र लेखी परीक्षा मंगळवार 18 जुलै 2023 ते मंगळवार 8 ऑगस्ट 2023 या कालावधीत होणार आहे. या परीक्षेचे दिनांक निहाय सविस्तर वेळापत्रक www.mahahsscboard.in या बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध करुन देण्यात आले आहे.