चंदगड : कुदनूरचे सुपुत्र व शिक्षणविस्तार अधिकारी सुधीर मुतकेकर यांचा सेवनिवृतिनिमित शुभेच्छा समारंभ उत्साहात

चंदगड प्रतिनिधी/पुंडलिक सुतार
कुदनूर ता.चंदगड चे सुपुत्र व पंचायत समिती चंदगड चे शिक्षणविस्तार अधिकारी सुधीर भावकू मुतकेकर हे शैक्षणिक क्षेत्रातील विविध पदावर उल्लेखनीय कार्य करून 37 वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर बुधवार दि 31 मे 2023 रोजी सेवानिवृत्त झालेने सेवनिवृत्तीनिमित त्यांचा सपत्नीक सत्कार छ.शिवाजी ज्युनिअर कॉलेज नेसरी चे माजी उपप्राचार्य एस एन राजगोळकर व शिक्षिका सुजाता सरवनकर ,श्रीमती पुष्पमाला जाधव (माजी अध्यक्षा, जि प कोल्हापूर), व मान्यवरांच्या हस्ते शाल,श्रीफळ,पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला कोवाड येथील श्री मंगल कार्यालय येथे सदर समारंभ माजी उपप्राचार्य एस एन राजगोळकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला प्रास्ताविक विठोबा मुंगूरकर यांनी केले यानंतर उपस्थित मान्यवर व्यक्तींचा सत्कार पार पडला मनोगत व्यक्त करताना
कल्लाप्पाना भोगण जि प सदस्य म्हणाले की सुधीर मुतकेकर सर यांच्यासारखी शिक्षण क्षेत्रात आदर्श माणसे अशा सर्व आदर्श सरांच्यामुळे जि प शाळेतही मुले चांगली घडत आहेत असे सांगितले यानंतर बोलताना शिवाजी पाटील अध्यक्ष शिक्षक संघ चंदगड म्हणाले की सरांनी उर्वरित वेळ कुटुंबासाठी द्यावा व आम्हालाही मार्गदर्शन करीत रहावे असे सांगितले यानंतर एन व्ही पाटील सरचिटणीस शिक्षक समिती चंदगड म्हणाले की सरांचे काम अत्यंत चोखपणे असायचे तसेच ते आपली कामे पार पाडण्यात नेहमी तरबेज असायचे तर सरांच्या कामावर सर्व शिक्षक व अधिकारी खुश असायचे अशा शब्दात कौतुक केले सदानंद पाटील सर अध्यक्ष शिक्षक संघ चंदगड म्हणाले की सरांच्या चेहऱ्यावर नेहमी स्मित हास्य असते ते प्रसन्न व्यक्तिमत्व असून त्यांच्या कार्याचे करावे तेवढे कौतुक थोडे आहे असे सांगितले यानंतर बोलताना सत्कारमूर्ती सुधीर मुतकेकर सर म्हणाले की सेवाकाळात मला सर्व सहकारी शिक्षक व अधिकारी वर्गाने सहकार्य केले असे सांगून सत्कारापूर्ती कृतज्ञता व्यक्त केली व आपल्या सेवकाळाचा आढावा घेतला यानंतर बोलताना माजी उपप्राचार्य एस एन राजगोळकर म्हणाले की सर माझे अत्यंत जवळचे असलेने त्यांची शैक्षणिक कार्यपद्धती वाखाणन्यासरखी होती अशा शब्दात कौतुक केले सरांचा सत्कार 19 केंद्राच्या वतीने झाला तसेच नातेवाईक,मित्र परिवार,ग्रामस्थ,शिक्षण व्यवसथापन समिती, सर्व शिक्षक, शिक्षण समित्या,शिक्षक संघ,शिक्षक संघटना,पंचक्रीशीतील ग्रामपंचायती यांच्या वतीने पार पडला यावेळी सर्व मान्यवर उपस्थित होते