सदाशिवराव मंडलिक महाविद्यालयात ७९ वा भारतीय स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

मुरगुड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
सदाशिव मंडलिक महाविद्यालयात एनसीसी विभागाच्या वतीने ७९ वा भारतीय स्वातंत्र्य दिन उत्साहात पार पडला. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवाजी होडगे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. जिमखाना प्रमुख-उपप्राचार्य डॉ. शिवाजी पोवार यांनी याप्रसंगी कार्यक्रमाचे प्रास्ताविक सादर करताना तरुणांनी व्यसनाच्या आहारी न जाता राष्ट्रप्रेम जोपासावे असा संदेश दिला. त्यानंतर एनसीसी विभागाकडून एनसीसी विभाग प्रमुख लेफ्टनंट विनोदकुमार प्रधान यांच्या मार्गदर्शनाखाली कॅडेट सुशांत मसवेकर व आदित्य तहसीलदार यांच्या नेतृत्वाखाली भारतीय झेंड्याला मानवंदना देण्यात आली.
त्यानंतर महाविद्यालयाच्या दादोबा मंडलिक सभागृहामध्ये अमर शिंदे, कु. प्राची कळमकर, कु. गौरी परीट, कु. वैष्णवी कुंभार, कु. आरती गिरिबुवा, श्री. नितेश रायकर, प्रा. दीपक साळुंखे, डॉ. फराकटे, श्री. संदीप मोहिते यांची भाषणे झाली. आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. होडगे यांनी आजचा युवक हा उद्याच्या राष्ट्राचा आधारस्तंभ असून त्यांनी देशाच्या विकासासाठी हातभार लावला पाहिजे असे मत व्यक्त केले.
यानंतर महाविद्यालयाच्या सांस्कृतिक विभागामार्फत प्रा. दीपक साळुंखे यांनी देशभक्तीपर सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले. यामध्ये कु. मधुरा जाधव, सायन्स विभागाच्या सौ. हर्षदा पाटील भूगोल विभाग प्रमुख प्रा. डी. ए. सरदेसाई, हिंदी विभागाचे श्री. बी. के. सारंग, अर्थशास्त्र विभागाचे डॉ. जी. आय. सामंत, सौ. अर्चना कांबळे, लेफ्टनंट प्रा. विनोदकुमार प्रधान यांनी कराओके संगीतावर देशभक्तीपर गीते सादर केली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. सुशांत पाटील यांनी केले. संपूर्ण कार्यक्रमाचे छायाचित्रण व व्हिडिओ शूटिंग श्री. नितेश रायकर यांनी केले. तर संपूर्ण कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सौ. अर्चना कांबळे यांनी केले.
सदर कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे सर्व विद्यार्थी-विद्यार्थिनी, प्राध्यापक वृंद, प्रशासकीय व चतुर्थ श्रेणी कर्मचारी आणि नर्सिंग विभागाकडील शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.