पॉवरलिफ्टिंग खेळाडू जान्हवी सावर्डेकर ची दक्षिणपूर्व मध्य रेल्वेत CCTC ( क्लास टू ) या पदावर निवड

मुरगुड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
मुरगुड येथील आशियाई पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत चार सुवर्णपदके पटकावलेल्या कु.जान्हवी जगदीश सावर्डेकर हिची खेळाच्या कोट्यातून दक्षिणपूर्व मध्य रेल्वे बिलासपूर ( छत्तीसगड ) येथे CCTC ( क्लास टू ) या पदावर निवड झाली आहे .
जान्हवी सावर्डेकरने यापुर्वी इस्तंबुल ( तुर्की )आशियाई पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत चार सुवर्णपदके पटकावली आहेत . राष्ट्रीय व राज्य पॉवरलिफ्टिंग अजिंक्यपद स्पर्धातुन ज्युनियर, सिनीयर गटात सुवर्ण व रौप्यपदके पटकावली आहेत . तसेच अखिल भारतीय आंतरविद्यापीठ पॉवरलिफ्टींग अजिक्यपद स्पर्धत ७६ किलो वजन गटात रौप्यपदक पटकावले आहे . राष्ट्रीय व राज्य स्पर्धत १३ सुवर्ण, ५ रौप्य व ४ कांस्यपदके पटकावली आहेत .
तिला मार्गदर्शक प्रशिक्षक विजय कांबळे व वडील जगदीशकुमार सावर्डेकर , भाऊ मयुर व नितीन सावर्डेकर यांचे प्रोसाहन लाभले.