शिष्यवृत्ती परीक्षेत हर्ष प्रकाश सुतार राज्यात सहावा

कळे प्रतिनिधी : अनिल सुतार
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या मार्फत घेण्यात आलेल्या सन 2023 च्या शिष्यवृत्ती परीक्षेत कु. हर्ष प्रकाश सुतार याने राज्यांमध्ये सहावा क्रमांक पटकावला आहे. त्यामुळे त्याचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्यामार्फत गुणवंत विद्यार्थ्यांना शिक्षणात प्रोत्साहन मिळावे व भविष्यात त्यांची प्रगती व्हावी म्हणून इयत्ता पाचवी व इयत्ता आठवीतील विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा घेतली जाते या परीक्षेत गुणवत्ता यादी मध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांना शासनातर्फे विशिष्ठ रक्कम देऊन प्रमाणपत्र दिले जाते. जेणेकरून त्यांना पुढील शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळावे व स्पर्धा परीक्षेचे ज्ञान व्हावे हा परीक्षेमागचा उद्देश असतो.
हर्ष प्रकाश सुतार हा विद्यार्थी पन्हाळा तालुक्यातील हरपवडे येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेत आहे या शाळेच्या व दिशा कोचिंग क्लासेसच्या माध्यमातून पाचवीत असताना शिष्यवृत्ती परीक्षेला बसला होता. हर्ष सुतार याने शिष्यवृत्ती परीक्षेत 300 पैकी 280 गुण प्राप्त करून राज्यांमध्ये सहावा क्रमांक पटकावला आहे.
त्याबद्दल त्याला वर्गशिक्षक प्रकाश पाटील (गोठे),अरुण सुतार, प्रशांत सुतार,हेमंत खोडके व आई,वडिलांचे मार्गदर्शन लाभले.