ताज्या बातम्यामहाराष्ट्र
राजे बँकेच्या संचालकपदी अमर उर्फ छोटू चौगले यांची निवड

मुरगूड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
मुरगूड ता. कागल येथील अमर ( छोटू ) धोंडीराम चौगले यांची कागल येथील राजे विक्रमसिंह घाटगे सहकारी बँकेच्या संचालकपदी बिनविरोध निवड झाली.
चौगले हे सध्या कागल तालुका संजय गांधी निराधार समितीवर सदस्य म्हणून काम पहात आहेत . त्यांच्या या निवडीकामी शाहु ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांचे सहकार्य लाभले .