युवा लघु उद्योजकांच्या वीज पुरवठा व वितरणातील समस्या संदर्भात लवकरच ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्याकडे पाठपुरावा करू: युवा नेते विरेंद्र मंडलिक

कागल प्रतिनिधी :
कागल पंचतारांकित एमआयडीसीतील युवा लघुउद्योजकांची विज बिल भरणे व वीज कनेक्शन पूर्वसूचना न देता महावितरण विभागाकडून करून बंद करणे या संदर्भात कागल महावितरण कार्यालयात युवा लघुउद्योजक व अधिकाऱ्यांची बैठक घेऊन लघुउद्योगांच्या समस्या मांडल्या. यावेळी महावितरणकडून विक्रम सपाटे यांनी सर्वांचे मत म्हणणे ऐकून घेतले.
लघुउद्योजकांच्या कडून युवा नेते वीरेंद्र मंडलिक यांनी सर्वांचे मत मांडून महावितरण अधिकाऱ्यांना विनंती केली की, वीज वितरण विभागाने वीज बिल भरून घेताना टप्पे देऊन बिल घेतले पाहिजे. वीज कनेक्शन पूर्वसूचना न देता बंद करणे थांबविले पाहिजे तसेच विज बिल वसूल करताना कर्मचारी वर्गाने ग्राहकांशी सभ्य भाषेत संवाद साधला पाहिजे असे आग्रही मत मांडले .
कोरोना काळामध्ये उद्योजकांचे व्यवसाय विस्कळीत झाले आहेत ते पूर्ववत होईपर्यंत शासनाकडून त्यांना सहकार्य होणे अपेक्षित आहे यासाठी लवकरच ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांच्याशी भेटून या संदर्भातील अनेक मागण्या ,समस्या मांडणार आहोत असे मत युवा नेते वीरेंद्र संजय मंडलिक यांनी मानले .
यावेळी महावितरण विभागाचे अधिकारी विक्रम सपाटे, कागल पंचायत समितीचे माजी सभापती विश्वास कुराडे, पंचायत समिती सदस्य राहुल महाडिक ,सदा साखर चे संचालक कैलास जाधव, एमआयडीसीतील युवा उद्योजक निलेश पाटील ,मनोज पाटील, यासीन मकानदार ,संदीप ढेरे व कागल परिसरातील युवक उपस्थित होते.