मराठा आरक्षण : संभाजीराजे म्हणतात दोन मिनिटांत महाराष्ट्र पेटवू शकतो ?

कोल्हापूर प्रतिनिधी:
मराठा आरक्षणासाठी मराठा क्रांती मोर्चाची भूमिका आतापर्यंत सामंजस्याची आहे. दोन मिनिटांत महाराष्ट्र पेटवू शकतो. पण, आपल्याला ते करायचे नाही.ही लढाई संयमानेच लढली जाईल, अशी भूमिका मराठा आरक्षण लढ्याचे नेते खा. संभाजीराजे यांनी सोमवारी मांडली.मराठा आरक्षणाबाबत केंद्र आणि राज्य सरकार जबाबदारी ढकलत असून इतर मागण्यांबाबतही गांभीर्याने घेतले जात नाही. त्यामुळे यापुढे मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचा लढा पुन्हा सुरू करण्यात येईल.त्याची सुरुवात नांदेड येथून मूक आंदोलनाने करण्याचा निर्णय पुणे येथे सोमवारी झालेल्या मराठा क्रांती मोर्चाच्या बैठकीत घेण्यात आला. या बैठकीत झालेल्या चर्चेची आणि झालेल्या निर्णयाची माहिती संभाजीराजे यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी त्यांनी आंदोलनामागील भूमिका स्पष्ट केली.दरम्यान, औरंगाबाद येथे दि. 19 ऑगस्ट रोजी राज्यव्यापी बैठकही घेण्याचे यावेळी निश्चित करण्यात आले.मराठा क्रांती मोर्चा, पुणे जिल्ह्याच्या वतीने राज्यव्यापी बैठक आयोजित करण्यात आली होती.