ताज्या बातम्यामहाराष्ट्र
पी . एफ.आय. संघटनेने पुण्यात दिलेल्या पाकिस्तान झिंदाबाद घोषणेच्या निषेधार्थ शिवबाचा मावळा संघटनेची निदर्शने ,पाक ध्वजाची केली होळी

प्रतिनिधी : रोहन भिऊंगडे
पुणे येथील आंदोलनात पी. एफ.आय.संघटने ने दिलेल्या पाकिस्तान झिंदाबाद घोषणेच्या निषेधार्थ शिवबाचा मावळा संघटनेने आज मिरजकर तिकटी येथे जोरदार निदर्शने करण्यात आली. यावेळी जिनको चाहिए पाकिस्तान उनको भेजो कब्रस्थान , पी एफ आय च्या गुंडांना गोळ्या घाला अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.यावेळी पाकिस्तान ध्वजाची होळी करण्यात आली.
यावेळी संस्थापक अध्यक्ष माजी नगरसेवक अमोल माने , जिल्हा अध्यक्ष जयदीप सरवदे, विनोद जाधव, तानाजी इंगळे रहीम भाई सनदी,असिफ शेख,विकी देसाई,अभिजीत पाटील,राजू पोवार, आशिष जाधव,प्रफुल्ल काळे,आदर्श माने, गुंडोजी कोळी , निवास गायकवाड,दत्तात्रय कोटमिरे,कुणाल शिंदे आदी उपस्थित होते