ताज्या बातम्यामहाराष्ट्र

प्रा. सुषमा पाटील यांच्या ‘पुसट रेषा.. ठळक रेषा..’ या लेखसंग्रहाचे रविवारी प्रकाशन

निकाल न्यूज प्रतिनिधी : विजय मोरबाळे

कोल्हापूर येथील जिल्हा परिषद कोल्हापूर संचलित, मेन राजाराम हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये कार्यरत असणाऱ्या विद्यार्थी प्रिय शिक्षिका, प्रसिद्ध व्याख्यात्या व निवेदिका प्रा. सुषमा पाटील यांच्या ‘पुसट रेषा ..ठळक रेषा..’या लेखसंग्रहाचा प्रकाशन समारंभ रविवार दि. 23 फेब्रुवारी रोजी होत आहे.

सदर प्रकाशन समारंभ श्रीकृष्ण सभागृह, पाचगाव ,गिरगाव रोड, कोल्हापूर येथे ठिक सकाळी ११.१५मिनिटांनी अप्पर मुद्रांक नियंत्रक मुंबईचे संजयसिंह चव्हाण (I A S), दूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्र, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूरचे संचालक डॉ. कृष्णा पाटील, चिकोत्रा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रावसाहेब पाटील, प्रमुख वक्ते प्राचार्य जीवन साळोखे ,महाराष्ट्रातील प्रसिद्ध प्रकाशक त्रिभुवननाथ जोशी, मुख्याध्यापक संघाचे सचिव आर .वाय. पाटील, मुख्याध्यापक संघाचे उपाध्यक्ष ,पत्रकार मिलिंद पांगिरेकर,मेन राजाराम हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य डॉ. गजानन खाडे ,एम.आर. हायस्कूल व जुनिअर कॉलेज गडहिंग्लजचे प्राचार्य संजय कुंभार, भुदरगड तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष सुरेश पाटील, जंगल अभ्यासक,झूंड कादंबरीचे लेखक दत्ता मोरसे,बिद्री साखर कारखान्याचे संचालक संभाजी पाटील (कावणे), जी आर पाटील (चुये), ज्येष्ठ साहित्यिक के. बी. पाटील (गुरुजी), आनंदराव पाटील प्रशाला काळम्मा बेलेवाडीचे मुख्याध्यापक आर के पाटील यांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे .

कोल्हापूर जिल्हा मराठी अध्यापक संघाचे अध्यक्ष राजेंद्र पाटील ,उपाध्यक्ष पी.डी .पाटील व सर्व सदस्य मंडळींनी या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks